
अनेक शेतकरी आपले गुरे- जनावरे बांधण्यासाठी विजेचे खांब, स्टे यांचा वापर करीत असतात. तसेच काही लोक अशा पोल किंवा स्टे वायरच्या सानिध्यात बांधकाम करतात.
अनेकदा काही कारणांमुळे अशा पोल मध्ये किंवा स्टे वायर मध्ये विजेचा सप्लाय उतरतो. अशा वेळेस एखाद्या व्यक्तीचा किंवा जनावराचा अशा पोलला किंवा स्टे वायरला नजर चुकीने स्पर्श झाल्यास सदर ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी-
१. ज्या ठिकाणी पोल किंवा स्टे वायर असेल त्या ठिकाणापासून सुरक्षित अंतर सोडून आपला वावर असावा किंवा आपले कामकाज करावे, याची विशेष काळजी घ्या आणि त्यामुळे अपघात किंवा गंभीर इजा होऊ शकते. सुरक्षित अंतर ठेवणे हे आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
२. पोल आणि स्टे वायरच्या बाजूला बांधकाम करू नये, कारण त्यामुळे संरचना अत्यंत अस्थिर होण्याची शक्यता असते आणि अपघातांची अवस्था निर्माण होऊ शकते.