सर्व शेतकरी बांधवांचे शेतकरी ऊर्जा वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे !
शेतकरी बांधवांना शेतीसाठी वीज हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. काही वेळेस शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध असून देखील केवळ वीज नसल्याने पिके जळाल्याचे दिसून येते. वीजेच्या या समस्यांवरील शास्त्रीय उपायांसंदर्भात शेतकऱ्यांना योग्य माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, जसे कि, कमी व्होल्टेज मिळणे, स्टार्टर बिघडणे, मोटार पंप खराब होणे, केबल जळणे किंवा खराब होणे, ई. या सर्व समस्यांवर एकच रामबाण इलाज म्हणजे प्रत्येक शेतीपंपाला कॅपॅसिटर वापरणे हा होय! केवळ एक कॅपॅसिटर वापरल्याने शेतकऱ्यांची मोटार, स्टार्टर, केबल यांचे बिघाड होण्याची शक्यता कमी होते आणि सर्व उपकरणांचे आयुष्य वाढते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कॅपॅसिटरची किंमत हि जवळपास एका महिन्याच्या मोबाईल रिचार्ज एवढीच असते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वीजेचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपल्याला येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात. अशा कॅपॅसिटरची जादू बघण्यासाठी खालील व्हिडीओ आवर्जून बघा!
सुज्ञ नागरिकांनी वीजेच्या समस्या सोडविणे संदर्भात नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करणे साठी प्रत्येक शेतीपंपांना कॅपॅसिटर बसविणे फायदेशीर ठरते. त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून श्री. सुजय रोहिणी रामचंद्र उपाध्ये यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत श्री. उपाध्ये यांच्या मार्फत डिपीसभा, ग्रामसभा, प्रसिद्धी पत्रके, वर्तमान पत्रे, युट्यूब व्हिडीओ, व्हॉट्सअप आदी समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे.
कॅपॅसिटरचा वापर कसा करावा? अधिक माहितीसाठी क्लिक करा !
तुमची डीपी वारंवार नादुरुस्त होत असेल तर येथे अधिक माहिती घ्या…