श्री. उपाध्ये यांचे उपक्रम

शिक्षण
बीई इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल,
आयटीआय, एनसीव्हीटी,
एलएल. बी, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन राईट्स

श्री सुजय रोहिणी रामचंद्र उपाध्ये हे विद्युत अभियंता असुन सन १९९९ पासून वीज क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी खाजगी कंपन्या आणि महाविद्यालयांमध्ये नोकरी केली असुन सन २०१४ पासून ते महाराष्ट्र राज्य शासन उपक्रमाच्या विद्युत विभागात कार्यरत आहेत. शासनाची नोकरी करतानाच त्याच माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांसाठी प्राणप्रिय असलेल्या डीपी अर्थात विद्युत रोहित्र नादुरुस्ती आणि देखभाल या विषयावर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले आहे. आपण प्राप्त केलेल्या अनुभव आणि ज्ञानाद्वारे समाजाचे आणि शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत.

आत्ता पर्यंत त्यांनी सुमारे १०० विद्युत अभियंते आणि २५० ते ३०० तांत्रिक कर्मचारी यांना डीपी अर्थात विद्युत रोहित्र नादुरुस्ती व देखभाल आणि कॅपॅसिटरचा प्रभावी वापर या विषयाचे प्रशिक्षण दिले आहे.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी वारंवार नादुरुस्त होणारे रोहित्रे आणि कॅपॅसिटरचा प्रभावी वापर याबाबत शेतकऱ्यांच्या विविध गटांमध्ये जाऊन डीपी सभा आणि गावागावात ग्रामसभा घेऊन त्याद्वारे प्रबोधन केले आहे. शेतीपंपाला कॅपॅसिटर वापरल्यामुळे विजेची बचत होऊन शेतीपंपाला चांगल्या दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा होतो म्हणूनच गांडूळा प्रमाणेच कॅपॅसिटर हा देखील शेतकऱ्याचा आधुनिक मित्र आहे याची जाणीव शेतकऱ्यांना विविध मार्गांनी करून देत आहेत.

अ. क्र.कामाचे स्वरूपफाईल बघा
माझे उपकेंद्र, स्वच्छ उपकेंद्र सुरक्षित उपकेंद्र स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक मिळाले.क्लिक करा
गाळणी कक्ष, श्रीरामपूर येथे केलेली उल्लेखनीय कामे- भाग- १क्लिक करा
गाळणी कक्ष, श्रीरामपूर येथे केलेली उल्लेखनीय कामे- भाग- २क्लिक करा
विभागीय कार्यालय, श्रीरामपूर येथे केलेली उल्लेखनीय कामेक्लिक करा
नादुरुस्त डीपी खाजगी एजन्सीला दुरुस्तीसाठी न देता जागेवरच दुरुस्त करून घेतले.क्लिक करा
कार्यक्षेत्रातील सर्व शेतीपंप धारकांनी कॅपॅसिटर वापरावेत यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास कॅपॅसिटरचे महत्व सांगणारी दिलेली काही पत्रे.क्लिक करा
कृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या कॅपॅसिटरची माहिती आपल्या वार्षिक पत्रिका कृषिदर्शनी मध्ये छापणे आणि कॅपॅसिटरचा पाठ कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ठ करण्यासाठी विनंती पत्र. क्लिक करा