शेती पंपांना कॅपॅसिटर वापराचे फायदे खालील प्रमाणे आहेत-
- शेती पंप मोटारच्या तीनही फेजला सारखे व्होल्टेज मिळण्यास मदत होते.
- लो-व्होल्टेज असलेल्या ठिकाणी कॅपॅसिटर वापरल्यास, व्होल्टेज वाढण्यास मदत होते.
- शेती पंप मोटार वापरासाठी कमी करंट लागतो.
- मोटारने कमी करंट घेतल्याने आपल्या डिपी वरचा लोड कमी होतो आणि डिपीचे आयुष्य वाढते.
- मोटार, केबल, फेज गरम होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मोटारचे आयुष्य वाढते.
- आणि ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणून डीपी जाळण्याचे प्रमाण कमी होते.
कॅपॅसिटर म्हणजे वीजेच्या अनेक समस्यांवर रामबाण इलाज सोबत वीजेची बचतही शक्य !
कॅपॅसिटर न वापरल्यामुळे अमुल्य अशी वीज वाया जाते. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीपंपाला कॅपॅसिटर वापरल्यास वाया जाणाऱ्या वीजेची बचत होऊ शकते. १०० केव्हीए क्षमतेच्या एका डीपी वर शेती पंपांना कॅपॅसिटर न वापरल्यास एकाच डीपी वर जवळपास १२ वॉटचे १६०० एलईडी दिव्यांना लागणारी उर्जा खर्च होते. एकाच डीपीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर उर्जा खर्च होते तर मग एका गावात वाया जाणाऱ्या वीजेची फक्त कल्पना करा! ही वाया जाणारी वीज ना शेतकऱ्यांना उपयोगी येते ना देशाला उपयोगी येते. कॅपॅसिटर वापरामुळे देशाची अब्जावधी रुपयांची शक्ती वाया जाते. आपण आज जर ही शक्ती वाचवली तर ती पुढील पिढीच्या उपयोगात येणार आहे. याशिवाय वीज बचतीमुळे राज्यातील ग्राहकांवरील भार कमी होऊन घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक वीजेचे दर देखील कमी होऊ शकतात.

मोटरला आवश्यक कॅपॅसिटरची रेटींग–

मोटरला कॅपॅसिटर जोडण्याची पद्धत-

वर उल्लेख केल्यानुसार वेळोवेळी डिपी सभा, ग्रामसभा, वर्तमान पत्रे, युट्यूब व्हिडीओ, व्हॉट्सअप आदी माध्यमांद्वारे अनेकदा विनंती आणि जनजागृती करून देखील अनेक शेतकरी बांधव अद्याप देखील कॅपॅसिटर वापराबाबत निष्क्रियता दर्शवित आहेत. त्यामुळे विनाकारण मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होत आहे. त्या खर्च होणाऱ्या उर्जेचा शेतकऱ्यांना किंवा पर्यावरणाला देखील काहीही फायदा होत नाही. हि खर्च होणारी ऊर्जा हे देशाचे आणि पुढील पिढीचे कधीही न भरून येणार नुकसान आहे ही बाब अधोरेखित करावी लागेल. सर्व शेतकऱ्यांनी कॅपॅसिटर वापरल्यास लो व्होल्टेजची समस्या नक्कीच कमी होते हे विविध शास्त्रीय प्रयोगाने वारंवार सिद्ध झाले आहे.
बाजारात विकत मिळणारे कॅपॅसिटर कसे दिसतात?


कॅपॅसिटर बद्दल शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी क्लिक करा !
तुमची डीपी वारंवार नादुरुस्त होत असेल तर येथे अधिक माहिती घ्या…