सर्व शेतकरी बांधवांचे शेतकरी ऊर्जा वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे !

शेतकरी बांधवांना शेतीसाठी वीज हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो.

सुज्ञ नागरिकांनी वीजेच्या समस्या सोडविणे संदर्भात नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे.

नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक शेतीपंपांना कॅपॅसिटर बसविणे फायदेशीर ठरते. त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून श्री. सुजय रोहिणी रामचंद्र उपाध्ये यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम सुरु केली आहे आणि त्याअंतर्गत श्री. उपाध्ये यांच्या मार्फत डिपीसभा, ग्रामसभा, प्रसिद्धी पत्रके, वर्तमान पत्रे, युट्यूब व्हिडीओ, व्हॉट्सअप आदी समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे.

कॅपॅसिटर न वापरल्यामुळे अमुल्य अशी वीज वाया जाते.

वेळोवेळी डिपी सभा, ग्रामसभा, वर्तमान पत्रे, युट्यूब व्हिडीओ, व्हॉट्सअप आदी माध्यमांद्वारे अनेकदा विनंती आणि जनजागृती केली आहे. हे करून देखील अनेक शेतकरी बांधव अद्याप देखील कॅपॅसिटर वापराबाबत निष्क्रियता दर्शवित आहेत. त्यामुळे विनाकारण मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होत आहे आणि महत्वाचे म्हणजे त्या खर्च होणाऱ्या उर्जेचा शेतकऱ्यांना किंवा पर्यावरणाला देखील काहीही फायदा होत नाही. हि खर्च होणारी ऊर्जा हे देशाचे आणि पुढील पिढीचे कधीही न भरून येणार नुकसान आहे ही बाब अधोरेखित करावी लागेल. सर्व शेतकऱ्यांनी कॅपॅसिटर वापरल्यास लो व्होल्टेजची समस्या नक्कीच कमी होते हे विविध शास्त्रीय प्रयोगाने वारंवार सिद्ध झाले आहे.

कॅपॅसिटर शेतकऱ्यांचा मित्र सुजय उपाध्ये

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीपंपाला कॅपॅसिटर वापरल्यास वाया जाणाऱ्या वीजेची बचत होऊ शकते. १०० केव्हीए क्षमतेच्या एका डीपी वर शेती पंपांना कॅपॅसिटर न वापरल्यास एकाच डीपी वर जवळपास १२ वॉटचे १६०० एलईडी दिव्यांना लागणारी उर्जा खर्च होते. एकाच डीपीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर उर्जा खर्च होते तर मग एका गावात वाया जाणाऱ्या वीजेची फक्त कल्पना करा! ही वाया जाणारी वीज ना शेतकऱ्यांना उपयोगी येते ना देशाला उपयोगी येते. कॅपॅसिटर वापरामुळे देशाची अब्जावधी रुपयांची शक्ती वाया जाते. समजा आपण आज जर ही शक्ती वाचवली तर ती पुढील पिढीच्या उपयोगात येणार आहे. म्हणूनच कॅपॅसिटर शेतकऱ्यांचा मित्र आहे असे श्री. सुजय उपाध्ये म्हणतात.

वर्तमान पत्रातील काही बातम्या-

कॅपॅसिटरचा वापर कसा करावा? अधिक माहितीसाठी क्लिक करा !

तुमची डीपी वारंवार नादुरुस्त होत असेल तर येथे अधिक माहिती घ्या…