विद्युत सुरक्षितता अत्यंत महत्वाची!

अ. क्र.माहिती पुस्तिकेचे नावभाषाफाईल बघा
केंद्रीय विद्युत प्राधिकरण, विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांची वीजेपासून सुरक्षिततेसंदर्भात माहिती पुस्तिकाहिंदीक्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभाग यांची विद्युत सुरक्षा संदेश पुस्तिकामराठीक्लिक करा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यांची वीजेपासून सुरक्षिततेसंदर्भात माहिती पुस्तिकामराठीक्लिक करा
संचालक, अग्निशमन आणि आणीबाणी सेवा संचालनालय, गोवा यांची आगीपासून बचाव संदर्भात माहिती पुस्तिकामराठीक्लिक करा

अनेक शेतकरी आपल्या पिकांचे प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी धातूच्या कुंपणामध्ये मशिनच्या सहाय्याने प्राण्यांना इलेक्ट्रिक शॉक देण्यासाठी वापरतात. परंतु असे मशीन वापरताना अनेक अपघात झाल्याचे उघडकीस केले आहे. अशा मशीन मध्ये बिघाड होऊन त्याचा स्पर्श एखाद्या व्यक्तीला झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मागील काही वर्षात अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. अशी घटना घडल्यास एखाद्या व्यक्तीला जीव तर गमवावा लागतोच परंतु यासोबत अशा प्रकारचे मशीन वापरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात येतो. त्यामुळे अशा स्वरूपाच्या मशीन वापरताना योग्य काळजी घ्यावी अन्यथा त्याचे कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागते.

शेतीपंप वापरासाठी शेतकरी स्टार्टर वापरतात. परंतु अनेकदा ते वापरत असलेल्या केबल जुन्या होतात आणि त्यावरील इंश्युलेशन खराब होते आणि आतील विजेची तार उघडी पडते. अश्या उघड्या तारेला एखाद्या व्यक्तीचा स्पर्श झाल्यास शॉक बसण्याची शक्यता असते. एखाद्या वेळेस अश्या उघड्या तारेचा स्पर्श स्टार्टरच्या बॉक्सला झाल्यास आणि त्या बॉक्सला एखाद्या व्यक्तीचा किंवा जनावराचा स्पर्श झाल्यास तेथे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी-

अशा प्रसंगांपासून बचावासाठी आपल्या शेतीपंप स्टार्टर बॉक्स मधली सर्व वायरिंगसाठी चांगल्या प्रतीच्या वायर वापराव्यात. तसेच आपल्या मेनस्वीच, लोखंडी पेटी, स्टार्टर बॉक्सला नटबोल्टच्या साहाय्याने ८ गेजच्या जीआय तार जोडून तिचे दोन चांगल्या ठिकाणी व्यवस्थित अर्थिंग करून घ्यावे. म्हणजे भविष्यात काही कारणास्तव आपल्या शेतीपंप स्टार्टर बॉक्समध्ये अथवा इतर लोखंडी भागात वीज प्रवाह उतरल्यास तो जीआय तारेमार्फत जमिनीत जाईल आणि संभाव्य जीवितहानी टळू शकेल.

_______________________________________________________

अनेक शेतकरी आपले गुरे- जनावरे बांधण्यासाठी विजेचे खांब, स्टे यांचा वापर करीत असतात. तसेच काही लोक अशा पोल किंवा स्टे वायरच्या सानिध्यात बांधकाम करतात. अनेकदा काही कारणांमुळे अशा पोल किंवा स्टे वायर मध्ये विजेचा सप्लाय उतरतो. अशा वेळेस एखाद्या व्यक्तीचा किंवा जनावराचा अशा पोलला किंवा स्टे वायरला नजर चुकीने स्पर्श झाल्यास सदर ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी-

१. ज्या ठिकाणी पोल किंवा स्टे वायर असेल त्या ठिकाणापासून सुरक्षित अंतर सोडून आपला वावर असावा किंवा आपले कामकाज करावे, याची विशेष काळजी घ्या आणि त्यामुळे अपघात किंवा गंभीर इजा होऊ शकते. सुरक्षित अंतर ठेवणे हे आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

२. पोल आणि स्टे वायरच्या बाजूला बांधकाम करू नये, कारण त्यामुळे संरचना अत्यंत अस्थिर होण्याची शक्यता असते आणि अपघातांची अवस्था निर्माण होऊ शकते.

_______________________________________________________

वास्तविक पाहता विद्युत यंत्रणेचे कामकाज करण्यासाठी विद्युत क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. त्यामध्ये विद्युत यंत्रणेचे कामाचे स्वरूप आणि तंत्रज्ञान, काम करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि काळजी, काम पूर्ण करण्याचे नियोजन या संदर्भात शिकवले जाते.
परंतु अनेक ग्राहक वीज यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच काम करीत असतात. परंतु असे केल्याने अशा व्यक्ती अपघाताला आमंत्रण देत असतात. असे बेकायदेशीर कामकाज केल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अपुऱ्या आणि ऐकीव माहितीमुळे अपघात होऊन जीव हानी होऊ शकते. मागील काही वर्षांत अशा स्वरूपाचे अपघात होऊन अनेक व्यक्तींचा जीव गेला आहे असे आढळून येते.

सुरक्षितता काळजी
प्रामुख्याने कोणतेही विद्युत काम करावयाचे असल्यास ते काम परवानाधारक व्यक्तींकडून करून घ्यावे.

_______________________________________________________

काही नागरिक आपल्या घराजवळ असलेल्या विजेच्या खांबाभोवती धोकादायक पद्धतीने बांधकाम करतात. परंतु असे केल्याने अनावधानाने किंवा अपघाताने विजेच्या तारांचा स्पर्श आपल्या कुटुंबातील व्यक्तींना होऊ शकतो व विद्युत अपघात घडू शकतो. अशा घडलेल्या अपघातांमध्ये अनेकदा जीवित हानी देखील झालेली आहे. म्हणून, घराच्या आसपासच्या वीजेच्या खांबांच्या वापर अशा पद्धतीने करण्यापूर्वी सुरक्षिततेचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

सुरक्षितता काळजी

कोणत्याही नागरिकांनी विजेच्या खांबाभोवती अथवा विजेच्या तारांखाली बांधकाम किंवा इतर वस्तू साठवण्यासाठी सदर जागेचे वापर करू नये

_______________________________________________________

वीजेच्या पोलला दोरखंड बांधणे, कपडे वाळत घालणे धोकादायक…

अनेकदा काही नागरिक आपल्या घराजवळ असलेल्या विजेच्या खांबांचा वापर खुले कपडे वाळत घालण्यासाठी करतात, ज्यामुळे त्यांना सुविधा मिळते कारण त्यांना कपडे वाळत घालण्यासाठी विशेष जागा तयार करण्याची आवश्यकता नाही. परंतु अनेकदा विजेचा प्रवाह खांबामध्ये उतरून सदर वीज प्रवाहाचा स्पर्श जवळच असलेल्या व्यक्तींना किंवा खेळण्याच्या आनंदात असलेल्या लहान मुलांना होऊन त्यामुळे विद्युत अपघात होऊन होऊ शकतात. या प्रकारच्या स्थितीत, सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण एक लहानसा दुर्लक्षही गंभीर दुखापती किंवा जीवित हानीच्या कारणांमध्ये बदलू शकतो. म्हणून, नागरिकांनी कृपया या गोष्टींचा विचार करून आणि योग्य सावधगिरी बाळगून कार्यवाही करणे आवश्यक आहे.

सुरक्षितता काळजी-

पोलला दोरखंड बांधून कपडे वाळत घातल्यामुळे जीवित हानी होऊ शकते त्यामुळे वीजेच्या कोणत्याही खांबाला दोरखंड बांधून कपडे वाळत घातल्यास ते धोकादायक होऊ शकते.

_______________________________________________________

काही नागरिक विजेच्या खांबा खाली अथवा लाईन खाली त्यांना लागणारे विविध साहित्याची साठवणूक करत असतात, ज्यामुळे त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंची सोय होते. परंतु, अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर ठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागू शकते अथवा लिकेज करंट मार्फत शॉक बसू शकतो, ज्यामुळे मोठा अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे, विजेच्या खांबाच्या अवतीभोवती कोणत्याही प्रकारच्या साहित्याचे साठवणूक करू नये, विशेषतः ज्वलनशील सामग्री आणि उपकरणे. यामुळे केवळ नागरिकांचे सुरक्षाच नव्हे, तर त्यांच्या संपत्तीचे संरक्षण देखील करता येईल. जेणेकरून मोठ्या अनर्थ टाळता येतील.

सुरक्षितता काळजी

कोणत्याही नागरिकांनी विजेच्या खांबाखाली अथवा विजेच्या तारांखाली ज्वलनशील वस्तू साठवण्यासाठी सदर जागेचे वापर करू नये.